त्र्यंबकेश्‍वरला स्टेट बँकेतील लॉकर तोडण्याचा प्रयत्न; बँकेची रात्रीची सुरक्षा रामभरोसेच

त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) : येथील  शुक्रवारी रात्री आठ वाजता सर्व कामकाज संपून नेहमीप्रमाणे दरवाजे कुलूप लाऊन शिपाई राजू दोबाडे घरी गेले व सकाळी साडेआठ वाजता कामावर आले. नेहमीप्रमाणे कुलूप उघडण्यासाठी गेले तो दरवाजाचे शटर तोडून फेकलेल्या अवस्थेत व प्रवेशमार्ग मोकळा पाहुन त्यांना धक्काच बसला...

त्र्यंबकेश्‍वर येथे कांची कामकोटी पिठाच्या जागेतील भर वर्दळीच्या जागेतील स्टेट बँकेत शुक्रवारी (ता.१५) मध्यरात्री चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून लॉकर व तिजोरी तोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे सकाळी साडेआठ वाजता शिपायांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना खबर दिली. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

रात्री बँकेची सुरक्षा रामभरोसेच..

पोलिसांना तत्काळ येऊन पहाणी केली व श्वानपथक मागविले. त्याने बँकेच्या मागील चौफुलीपर्यंत माग काढला. तेथून चोरटे वाहनातून पसार झाले असावेत. चोरीच्या प्रयत्नात चोरट्यांनी डी. व्ही. डी. आर व तीन पी. सी. ओ. लंपास केल्याने सीसीटीव्हीचा उपयोग झाला नसल्याचे कळते. विशेष म्हणजे या बँकेत दिवसा गार्ड असून, रात्री देवभरोसे बँक असते. शाखाधिकारी द्विवेदी यांनी पत्रकारांना टाळले. बँकेच्या मागील बाजूस हमरस्ता असून अंधार असतो. लगत मोकळी व अडगळीची इमारत असून कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे आढळून आले. पोलिस अधिकारी यांनी पाहणी करुन तपास सुरू केला आहे. परंतु, भर वस्तीत हा प्रकार घडल्याने चिंतेचा व चर्चेचा विषय झाला आहे. यात कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा >  लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?