थरारक! ट्रक अडवून चालकाचे हातपाय बांधून नेले निर्जनस्थळी; नाशिक-पुणे महामार्गावर मध्यरात्रीची घटना  

सिन्नर (जि.नाशिक) :  नाशिक-पुणे महामार्गावर मध्यरात्रीची घटना असून चालक बारा चाकी ट्रकमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन जात होता. दिंडोरी येथून पुण्याच्या दिशेने तो जात असताना ट्रकवर पाळत ठेवण्यात आली असावी. सफेद रंगाच्या चारचाकी गाडीत असलेल्या सात व्यक्तींनी ट्रक अडविला. आणि मग.....

ट्रक अडवून चालकाचे हातपाय बांधून नेले निर्जनस्थळी

चालक लखन पवार (वय ३०, रा. साक्री, हल्ली रा. म्हाडा कॉलनी, धुळे) त्यांच्या ताब्यातील भारत बेंज कंपनीच्या बारा चाकी ट्रक (एमएच १८, एए ८८६७)मध्ये ५९ लाख ४३ हजार ७१५ रुपये किमतीच्या मॅकडॉवेल्स कंपनीच्या दारूच्या बाटल्यांचे ९५० बॉक्स घेऊन जात होता. दिंडोरी येथून पुण्याच्या दिशेने तो जात असताना ट्रकवर पाळत ठेवण्यात आली असावी. सफेद रंगाच्या चारचाकी गाडीत असलेल्या सात व्यक्तींनी नांदूरशिंगोटे गावच्या शिवारात ट्रक अडविला. चालक पवार व त्यांच्या सहकाऱ्यास मारहाण करून त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना निर्जनस्थळी टाकून देण्यात आले होते. या घटनेत दहा लाख रुपये किमतीचा ट्रक, सुमारे ६० लाखांचा मद्यसाठा, चालकाचा हजार रुपये किमतीचा मोबाईल, खिशातील तीन हजार रुपये रोख घेऊन लुटारू पसार झाले.

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

ठिकठिकाणी नाकाबंदी

अथक प्रयत्नांनंतर आपली सुटका करून चालक पवार यांनी रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची मदत घेत नांदूरशिंगोटे गाठत पोलिसांना आपबीती सांगितली. दरम्यान, याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे नाशिकसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये देण्यात येऊन ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मात्र, चोरीस गेलेला मुद्देमाल कुठेही मिळून आला नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात चालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश

चालकाचे हातपाय बांधून साठ लाखांचे मद्य लांबविले 

चारचाकी वाहनातून पाठलाग करून निर्जन ठिकाणी चालकाला मारहाण करत सुमारे ६० लाख रुपयांचा मद्यसाठा असणारा ट्रक लांबविल्याची घटना सोमवारी (ता. १५) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. 
नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात ट्रकचालक व त्याच्या साथीदाराचे हातपाय बांधून व तोंडाला चिकटपट्टी लावून रस्त्याकडेच्या डोंगराजवळ टाकून ट्रक पळवून नेण्यात आला.