थरारक! दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात लक्झरी बसच उलटली; कोठरे फाट्याजवळील घटना

अंबासन (जि.नाशिक) : शनिवारी (ता.९) नामपूर-मालेगाव रस्त्यावरील कोठरे फाट्यानजीक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात लक्झरी बस उलटली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून, बसमधील प्रवासी जखमी झाले. या अपघातातील जखमींना वडनेर खाकुर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

अशी आहे घटना

शनिवारी (ता.९) साडेदहा वाजेच्या सुमारास नंदुरबारहुन पुण्याच्या दिशेने जाणारी लक्झरी बस नामपुर मालेगाव रस्त्यावरील कोठरे फाट्यानजीक लक्झरी बस (क्र.एमएच १८, बीजी ६३५४) दुचाकी (क्र. एमएच ४१, एव्ही ५३५०) ला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटली व भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार भगतसिंग रूपसिंग तवर हे ठार झाले तर अन्य प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती वडणेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल होत रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

जखमींना उपचारासाठी वडणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन जखमी अमोल राजेंद गांगुर्डे (रा. पिंपळनेर), भीमराव ज्योतीराव काळे (रा. क-हाड) व पंचायत समिती सदस्या सविता राजेंद्र पगार हे उपचार घेत असून वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपक निकम जखमींवर उपचार करीत आहेत. तर अन्य प्रवाशी मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप