दंडात्मक कारवाईसोबतच कोरोना टेस्ट संकल्पनेचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक; अधिकाऱ्यांकडून घेतला कोरोनाचा आढावा

नाशिक : नागरिकांमधून कोरोनाची भिती दुर झाली हि बाब समाधानकारक असली तरी सध्या कोरोना अधिक गतीने फैलावत असल्याची बाब गंभीर आहे. स्वतः सुरक्षित राहताना आपले कुटूंब, आजुबाजूचे लोक सुरक्षित राहतील याची काळजी प्रत्येकाने घेताना ‘मी जबाबदार' मोहिम प्रभावी पणे राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज नाशिक मध्ये केले.

नंदूरबार जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी ओझर विमानतळावरील विश्रामगृहात जिल्हाधिकारी, महापालिका, जिल्हा परिषद व पोलिस प्रशासनातील अधिकायांकडून कोरोना विषयक आढावा घेतला. यावेळी त्यांनी सुचना दिल्या. कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी उपलब्ध असलेल्या लसीचा पुरवठा राज्य सरकारच्या हाती नाही. केंद्र सरकारकडून जसा पुरवठा होईल त्याप्रमाणे जिल्हा निहाय पुरवठा केला जात आहे. लसीकरण मोहिम थांबविली नाही. नियोजनानुसार लसीकरण केले जात आहे. उपलब्ध साठ्यानुसार लसीकरण वेगाने पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य सचिव प्रदिप व्यास, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, पोलिस आयुक्त दिपक कुमार पांडे इत्यादी उपस्थित होते. 

लाट अपेक्षित नव्हती 

गेल्या वर्षभरापासून महापालिका, पोलिस अधिकारी व कर्मचारी कोरोना संसर्गाला तोंड देत आहे. सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने थोडी शिथिलता आली परंतू धैर्याने पालिकेची यंत्रणा कामाला लागल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व मायक्रो कन्टेनमेंट झोन तयार करण्याबरोबरचं बंद करण्यात आलेले कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले. बिटको व जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित करण्यात आले. महापालिका हद्दी मध्ये बेडची पुरेशी उपलब्धता असून व्हेन्टीलेटर, ऑक्सिजन बेड देखील सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

ट्रेसिंग मोहिमेचे कौतुक 

नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स हि त्रिसुत्री बंधनकारक करताना ट्रेसिंग, कन्टेन्मेंट झोन व ट्रिटमेंट हि त्रिसुत्री प्रशासनाकडून अमलात आणली जात आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाकडून मास्क परिधान न करणायांवर दंडात्मक कारवाई करताना मास्क न घातलेल्या व्यक्तींचे स्वॅब टेस्टींग करण्याच्या मोहिमेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुक केले. 

अर्थ-आरोग्यासाठी सेमि लॉकडाऊन 

कोरोनामुळे संपुर्ण लॉकडाऊन शक्य नाही, गेल्या वर्षात पुर्ण लॉकडाऊन करण्यात आल्याने गरीब, मध्यम वर्गिय व्यक्तींचे अर्थचक्र बिघडले. मात्र आता लॉकडाऊन परवडणारा नाही. त्यामुळे अर्थ व आरोग्य असे दोन्ही चक्रे नियंत्रणात ठेवण्यासाठी सेमी लॉकडाऊन करण्यात आल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्टीकरण दिले. शनिवार व रविवार असे दोन दिवस सेमि लॉकडाऊन राहिल. साधारण दोन महिने हि प्रक्रिया कायम ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती