दरोडा टाकून दीड कोटीची दारू लुटणारे गजाआड; नाशिक शहर पोलिसांची कारवाई 

नाशिक : विल्होळी (ता. नाशिक) येथे दारू वाहतुकीच्या आयशर ट्रकसह दीड कोटीची दारू लुटणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले. यात गुन्हेशोध विभागाने दोघा संशयितांना अटक केली.

नेमके घडले काय? 

विल्होळी शिवारात १८ जानेवारीला जगदीश संपत बोरकर आयशर (एमएच ४५, बीएम १६१०)मधून दिंडोरी येथून परनोड रिकॉर्ड इंडिया कंपनीतून एक कोटी ३८ लाख ३८ हजार ६१० रुपयांची ब्लॅडर स्प्राइड व १०० पायपर्स कंपनीची विदेशी दारू घेऊन दिंडोरीहून पनवेल, मुंबईला जात असताना संशयितांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ रात्री पावणेअकराच्या सुमारास चालकाला मारहाण करून ट्रकचा ताबा घेऊन चालकाच्या डोळ्यावर पट्टी बांधून उमराणे येथे मारहाण करीत, ट्रकमधून उतरवून नेत दारूसह ट्रक गायब गेला होता. पोलिसांनी गुन्ह्यातील एक कोटी ७६ लाख ८७ हजारांचे ९८१ विदेशी दारूचे बॉक्स ताब्यात घेतले. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

दोघांना येत्या २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

किरण खंडू साळुंके (वय ४२, पवननगर, सिडको) आणि अमोल अशोक दाभाडे ऊर्फ पारधी (वय २२, पंडितनगर झोपडपट्टी, उत्तमनगर सिडको) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. दोघा संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता दोघांना येत्या २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. गुन्हेशोध शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर, विशाल काठे, प्रवीण कोकाटे, विशाल देवरे, राहुल पालखेडे यांच्या पथकाने बोईसर औद्योगिक वसाहतीतून त्याला अटक केली, तर दुसरा संशयित अमोल दाभाडे मालेगाव-मनमाड चौफुलीवर येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला तेथे नीलेश भोईर, गौरव खांडरे, योगेश सानप, समाधान पवार आदींनी साफळा लावून अटक केली. 

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले