दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले ‘माकड’! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : माकडचाळे, मर्कटलीला असे शब्द उपरोधिक टीकेसाठी वापरले जातात. यात मर्कट मात्र बदनाम होते. पण कधी-कधी हेच मर्कट माणसापेक्षा अधिक समजूतदारपणे वागताना दिसते.

दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले वानरराज 

गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या वानराची भूक भागविण्यासाठी पिंपळगावचे सामाजिक कार्यकर्ते सोमेश्‍वर मोरे धावले. त्यांनी दिलेल्या अन्नाच्या दोन घासांविषयी कृतज्ञता ठेवत माकडाने बुधवारी थेट मोरे यांच्या मातोश्रींच्या दशक्रिया विधीत हजेरी लावली. एक प्रकारे मोरे यांचे अश्रू पुसण्यासाठीच हे माकड आल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटली. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता 
गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांअभावी परिसरात सामसूम होती. त्यामुळे परिसरातील पक्षी-प्राणी अन्नाअभावी भुकेने व्याकूळ होत होती. मनात नेहमी भूतदया असणारे पशुप्रेमी सोमेश्‍वर मोरे यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने त्या प्राण्यांच्या अन्नाची सोय केली. चार-दोन दिवसांनी ते फळे, अन्न माकडांना देत होते. संकटात मोरे यांनी त्या माकडांना दोन घास अन्नाचे देत कणव दाखविली. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

संकटात धावलेल्या मोरे यांचे सांत्वन
एखाद्याचे उपकार माणूस विसरतो, पण प्राणी नाही, याची प्रचीती आली. सोमनाथ मोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. बुधवारी दशक्रिया विधीप्रसंगी आप्तस्वकीय जमले. त्याच वेळी एक अनाहूत पाहुणा आला. तो पाहुणा वानर होते. गेल्या वर्षी उपासमारीच्या संकटात धावलेल्या मोरे यांचे सांत्वन करण्यासाठी जणू हे माकड आले. मोरे यांच्या मातोश्रींच्या फोटोजवळ बसले आणि काही वेळानंतर त्याने प्रस्थान केले.