दसरा मेळावा: ‘त्या’ रणरागिणींचा सेनेकडून सत्कार

रणरागिनी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जाणार्‍या नाशिकच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांची छेड काढणार्‍या शिंदे गटाच्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांना चोप देऊन त्यांना अद्दल घडविणार्‍या शिवसेनेच्या रणरागिणींच्या धाडसाबद्दल उपनेते सुनील बागूल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शालिमार कार्यालयात ज्यांचा सत्कार झाला, त्या रणरागिणींमध्ये उपजिल्हा संघटक मनीषा खांडबहाले, पश्चिम विधानसभा संघटक अलका गायकवाड, तालुका संघटक ज्योती भागवत, गायत्री पगार व श्रुती नाईक, शिवसेना महिला संघटक मीना देवकर, सीमा डावखर, भारती पाईकराव, संध्या धूमाळ, पुष्पा राठोड, मदुरा नाडर, मुक्ता लहाने, गंगू घुगे यांचा समावेश आहे. दसरा मेळ्यासाठी जात असलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांना खर्डी येथे शिंदे गटाच्या मद्यधुंद झालेल्या कार्यकर्त्यांनी महिलांकडे बघून अश्लील हावभाव करत दोन वेळा छेड काढण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर शिवसेच्या या रणरागिणींनी त्यांना चोप देत अद्दल घडविली. त्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक थोडे आहे, असे सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर आणि माजी महापौर विनायक पांडे यांनी नमूद केले.

हेही वाचा:

The post दसरा मेळावा: ‘त्या’ रणरागिणींचा सेनेकडून सत्कार appeared first on पुढारी.