दहावी- बारावी दिव्यांग परीक्षार्थीच्या समस्या निराकरणासाठी ‘सहायक सचिव’ 

नाशिक : एप्रिल व मे महिन्यात दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा आणि उच्च माध्यमिक १२ वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा काळात विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी सहायक सचिव तथा सहसचिव मंदाकिनी देवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य.शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. 

हेही पाहा > महाराष्ट्र पोलिस अकादमीतील भावी फौजदार 'सैराट'! शासनाच्या नियमांची धज्जीया VIDEO VIRAL

दिव्यांग परीक्षार्थीच्या समस्या निराकरणासाठी सहायक सचिव 

अहिरे यांनी पत्रकात नमूद केल्यानुसार, नाशिक विभागीय मंडळाचे कार्यकक्षेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थी, पालक यांच्या मदतीसाठी सहायक सचिव मंदाकिनी देवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थी, पालक यांनी काही अडचणी आल्यास किंवा संबंधित परीक्षेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सहायक सचिव मंदाकिनी देवकर यांचेशी ७७५५९०३४२७, ८८८८३३९४२३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक, गट/सर्व्हे नं.१५६०/१ आडगांव शिवार, न्यु इंग्लिश स्कुल जवळ मुंबई आग्रारोड, नाशिक येथे या कार्यालयाच्या पत्त्यावर देखील संपर्क करु शकता.  

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न