दाट धुक्यामुळे आणखी एक विचित्र अपघात! मजूर घेऊन जाणारी बस महामार्गाच्या कडेला पलटी; मोठं नुकसान

मालेगाव (जि.नाशिक) : सटाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघाताची घटना ताजी असताना शुक्रवारी (ता.१८) पहाटे आणखी एक विचित्र अपघात  मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ पाहायला मिळाला. घडलेल्या दृश्यामुळे नागरिकांमध्ये धडकी भरली आहे.

दाट धुक्यामुळे अपघातांची मालिका थांबत नाही....

दाट धुक्यामुळे अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बस आणि गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघात एवढं भयंकर आहे की, बसनं महामार्गाच्या कडेला उभी असलेली टॅक्सी आणि 2 टपऱ्यावर जाऊन पलटी झाली. आणि धक्कादायक बाब म्हणजे मॉर्निग वाक करणारा एक व्यक्तीचा बस खाली दबून मृत्यू झाला आहे.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

टॅक्सी आणि दोन टपऱ्याचं मोठं नुकसान
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ मजूर घेऊन जाणारी खासगी बस, गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक आणि टॅक्सी यांचा विचित्र भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस महामार्गाच्या कडेला पलटी झाली. यात बससह रस्त्याच्या कडेला उभी असलेली टॅक्सी आणि दोन टपऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा