दारणासांगवीतील शिवसैनिकांचा पक्षाला जय महाराष्ट्र; राष्ट्रवादीचे घड्याळ घेतले हाती 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निवडणुका असो किंवा नसो निफाड तालुक्यात राजकीय घडामोडी सुरूच असतात. दारणासांगवी येथील शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा झाला. राज्यात महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये कार्यकर्ते तोडफोडीचे राजकारण निफाडमध्ये पोचले आहे. 

अनेक प्रश्न रखडलेलेच...

चांदोरी गटातील दारणासांगवी गावात अनेक प्रश्‍न रखडले आहेत. पण त्याची सोडवणूक झाली नाही. त्यामुळे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे या वेळी विशाल आढाव यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. पण निफाडमध्ये ही महाविकास आघाडी कधीच आकाराला येणार नाही. त्याची झलक ग्रामपंचायत निवडणुकीत दिसली. आता दारणासांगवीचे संजय आढाव, शरद करपे, नाना मुळक, विशाल आढाव, दशरथ आढाव, संकेत जाधव, अनिल गोहाड, गणेश आढाव, योगेश मुळाणे यांनी आमदार बनकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

दारणासांगवीत ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या कांतिलाल बोडके, चिंतामण शेलार, कुसुम बेंडकुळे, सचिन यादव, रंजना काकड, सोनल साळवे, भाऊसाहेब गोहाड, सुवर्णा फड, सुनीता आढाव या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिवाजी शिंदे, गोटीराम शिंदे, रमेश वाळके, माणिक गोहाड, आनंद काकड, सुनील साळवे, आनंदा बेंडकुळे, गौरव गोहाड, चिंतामण शेलार, बाळू बोडके, भाऊसाहेब गोहाड, राहुल गोहाड, सचिन यादव आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

गेली दहा वर्षे दारणासांगवी विकासापासून दूर राहिले. पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जुन्या-नव्याचा संगम घडला असून, राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. 
-दिलीप बनकर, आमदार, निफाड