दिपोत्सव : बंदीगृहातील दीवाळी मेळ्यास प्रारंभ

दीवाळी मेळावा www.pudhari.news

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते जेलरोड येथील बंदीगृहातील दीवाळी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कारागृहाच्या प्रवेशव्दारावरील प्रगतीकेंद्रात दिपावलीच्या वस्तू नागरिकांना खरेदी करता येईल.

उद्घाटनप्रसंगी कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, शिवसेना शिंदे गटाचे भाऊलाल तांबडे, स्त्रीरोग तज्ज्ञ नलिनी बागूल, अश्विनी न्याहारकर, नलिनी कड, उपअधीक्षक सचिन चिकणे, अशोक मलवाड, विक्रम खारोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोडसे यांनी बंद्याच्या विशेष अशा कलागुणांची प्रशंसा केली. तसेच जास्तीत जास्त बंद्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. अमेरिकेतील ग्राहकांनीही बंद्यांच्या हातून तयार झालेल्या या वस्तू खरेदी केल्या आहेत. कारागृहातील नऊ छोट्या कारखान्यांमधून प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळतो आहे. यंदाही नागरिकांचा या दर्जेदार वस्तू खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रमोद वाघ यांनी सांगितले.

प्रगती केंद्रात या वस्तू मिळतील…

विविध प्रकारच्या सतरंज्या, प्रिटेंड बेडशिट, हातरुमाल, सागाचा बांगडी स्टॅंड, सागाची बैलगाडी, टर्निंग आणि वाकड्या पायाचा चौरंग, चावी स्टॅंड, सागाची डान्सिंग डाॅल, साग पाट, डायनिंग टेबल, शूज स्टॅंड, प्लाय सन दिवान, फिरते बुक स्टॅंड, साग मंदिर, फाईल ट्रे, टिपाय, सागाची फुलदानी, साग स्टॅंड, सागाचा सोफा सेट, सागाचा रिहाळ स्टॅंड, लहान व मोठे साडी कव्हर, बाटल बॅग, टिफीन बॅग, उशी, गादी, मच्छरदाणी, चेरी बॅग, जॅकेट, लेडीज पर्स, फ्रिज कव्हर, आराम चेअर, पणती, शूज रॅक, मेणबत्ती स्टॅंड, पत्रा सुपडी, शो पीस, फिनाईल, उटणे, साबण, डिटर्जंट पावडर, क्लिनर, बेल्ट, जप्पल, फायबर बैलजोडी व शेतकरी, राजस्थानी फायबर मूर्ती, सुगंधी उटणे, साबण, आकाशकंदिल, साफसाफईसाठी लागणारे फिनेल, ब्रश, फर्निचर आदीं वस्तूंसह गृहउपयोगी वस्तू व शोभेच्या वस्तूही उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा:

The post दिपोत्सव : बंदीगृहातील दीवाळी मेळ्यास प्रारंभ appeared first on पुढारी.