नाशिक शहरात करोना बाधितांच्या वाढत्या संख्येला गेल्या आठवड्यापासून काहीसा लगाम बसला असून, बाधितांच्या संख्येचा आलेख कमी होताना दिसत आहे. ही दिलासादायक बाब असून, Active रुग्णसंख्याही पाच हजारांवरून थेट साडेतीन हजारांवर आली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील करोना बाधितांचा रिकव्हरी रेट हा राज्यात सर्वाधिक ९१.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे.