दिल्लीतील आंदोलनाला २१ हजार शेतकऱ्यांचा पाठिंबा! राष्ट्रसेवा दलाची जिल्ह्यात सह्यांची मोहीम

येवला (जि. नाशिक) : शेतकरीविरोधी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नसले म्हणून काय झाले; उघडपणे पाठिंबा तर देऊ शकतो, या हेतूने जिल्ह्यात ‘एक सही शेतकऱ्यांसाठी’ या उपक्रमांत २१ हजार शेतकऱ्यांनी आपल्या सह्यांद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याचे पत्र येथे आज तहसिलदारांना देण्यात आले. 

राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात राष्ट्रसेवा दल, छात्रभारती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, 
शेतकरी पंचायत, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा व समविचारी संघटनांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबवली. जिल्ह्यात प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली १६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान शेतकरीविरोधी कायद्याबद्दल जनजागृती करण्यात आली. नागरीकांनी या कायद्याला विरोध दर्शवला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. प्रामुख्याने येवला, मालेगाव, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड, जव्हार, मोखाडा, नाशिक शहर, दिंडोरी या भागात स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. यातून प्रत्यक्ष स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेले एकूण २१ हजार शेतकरी असून, त्यांनी शेतकरी कायद्याला स्वाक्षरी देवून विरोध केला आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

स्वाक्षरी मोहिमेत नितीन मते, जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर दाणे, सरपंच सुनंदा काळे, ॲड. शरद कोकाटे, समाधान बागुल, सुधा कोकाटे, मंदा पडवळ, संगीता जगताप, पुंजाराम काळे, गणेश गाडे, भाऊसाहेब जगताप, संतोष गायकवाड, पंडित मढवई, रामनाथ पाटील, कानिफ मढवई, बाबासाहेब कोकाटे, कविता झाल्टे, उषाताई शिंदे, दौलत वाणी, बाळासाहेब चव्हाण, उतम बंड, राजेंद्र जाधव, दिलीप कचरे, उत्तम खांडेकर, सुकदेव आहेर, शरद शेजवळ, हेमंत पाटील, पांडुरंग चव्हाण आदींनी सहभाग घेतला.  

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!