दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना हिसकावली चैन आणि मोबाईल

सिडको (जि.नाशिक) : दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना काही एक कारण नसताना गळ्यातील चांदीची चेन व मोबाईल असा 19 हजारांचा ऐवज हिसकावून नेल्याचा प्रकार हॉटेल नाशिक दरबार, डीजीपीनगर परिसरात घडला आहे. 

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या घटनेची अधिक माहिती अशी, की आशिष भागवत गायकवाड ( वय 40, अंबड ) यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना मयूर दातीर, दिनेश खैरनार व संदीप पाटोळे यांनी काही एक कारण नसताना गायकवाड यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चार हजार रुपयांची चांदीची चेन बळजबरीने ओढून नेली, तर त्यांच्या ओळखीचा गणेश गोवर्धने हे काय चालू आहे, हे पाहण्यासाठी थांबले असताना " तू काय पाहतोस" असे बोलून त्यांना मारहाण करीत त्यांचा मोबाईल हिसकावून चोरून नेला . या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

 

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग