दिवाळीत नातेवाईकांकडे पाहूणे म्हणून आलेल्या वृद्धाचा अपघाती मृत्यु; परिसरात हळहळ

नाशिक : (गणूर) मुंबई - आग्रा महामार्गावर चांदवडनजीक भगवान भिवा भोसले (वय ६३, रा. कोंडवा पुणे) यांचा खाजगी बसच्या अपघातात बुधवारी (ता. १८) रोजी मृत्यु झाल्याची घटना घडली.

नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून आलेले होते...

चांदवड शहरातील खोकड तलावाजवळील वळणावर नाशिककडून मालेगाव जाणाऱ्या खाजगी बस (क्रमांक एम एच १८. ए एन ७२९९) ने रस्ता ओलांडणाऱ्या भगवान भोसले यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. भोसले हे दिवाळीनिमित्ताने चांदवड येथील नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून आलेले होते. याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.