दीड लाख शेतकऱ्यांनी भरली ११९ कोटींची कृषिपंपांची थकबाकी 

नाशिक : नाशिक परिमंडळात एक लाख ५३ हजार ६२० शेतकऱ्यांनी कृषिपंप थकबाकीपोटी ११९ कोटींचा भरणा केला आहे. तर महाकृषी ऊर्जा अभियानात ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणांतर्गत नाशिक परिमंडळात दोन हजार ८७३ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या करण्यात आल्या, अशी माहिती नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली. 

 परिमंडळात दोन हजार ८७३ कृषिपंपांच्या नवीन जोडण्या 

महाकृषी ऊर्जा अभियानात लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्याददोन हजार ५३४ जोडण्यांचा समावेश आहे. योजनेत कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना परिसरातील नजीकच्या रोहित्राची क्षमता पर्याप्त असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहेत. ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहे, त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यासह रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या नाशिक मंडळात ५०५, मालेगाव मंडळामध्ये २५५ आणि नगर मंडळामध्ये एक हजार ७७४ वीजजोडण्या अशा एकूण नाशिक परिमंडळामध्ये दोन हजार ५३४ जोडण्या देण्यात आल्या आहेत. 

राज्यात १ एप्रिल २०१८ पासून कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीत सवलतीचे ऑक्टोबर २० ला स्वतंत्र धोरण तयार जाहीर केल्यानंतर लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर व २०० मीटरच्या आतील तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे एका रोहित्राद्वारे दोन कृषिपंपांना वीजजोडणी तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

 थकबाकचा भरणा 

मंडळ शेतकरी थकबाकी भरणा 
नाशिक १९ हजार २६३ २२ कोटी ३६ लाख 
मालेगाव २३ हजार ७५ २६ कोटी ३६ लाख 
नगर १ लाख १०९३० ७० कोटी ७ लाख 
नाशिक परिमंडळ १ लाख ५३ २६८ ११९ कोटी 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

महावितरणने कृषिपंप नवीन वीजजोडणी व थकबाकी सवलत तसेच इतर मुद्द्यांच्या माहितीसाठी https://www.mahadiscom.in/solar/AG_Policy/index.php या स्वतंत्र वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. ज्या कृषिपंपधारकांना नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाइनद्वारे मराठीमध्ये अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर या वेबपोर्टलची लिंक देण्यात आली आहे. 
- दीपक कुमठेकर (मुख्य अभियंता महावितरण, नाशिक)