दीपोत्सव : धन्वंतरी पुजनाने धनत्रोयदशीचा आनंद द्विगुणित

धन्वंतरी पूजा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:

अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय

त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप

श्री धनवंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः

तेजोमय पर्व दिवाळीतील दुसरा महत्वाचा दिवस अर्थात धनत्रोयदशी शनिवारी (दि.२२) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आरोग्याचे दैवत भगवान धन्वंतरी यांचे मनोभावे पुजन केले.

दिवाळीच्या प्रकाशपर्वाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने वातावरणात चैतन्य पसरले आहे. नाशिककरांनी धनत्रोदशीचा आनंद द्विगुणित केला. वैद्यकीय क्षेत्रात भगवान धन्वंतरी यांची पुजन करून अवघ्या जगाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

वैद्य विक्रांत जाधव यांच्या अशोकस्तंभ येथील रूग्णालयात धन्वंतरी पुजन मोठ्या उत्साहात पार पडले. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सप्तत्नीक यांच्याहस्ते पुजन करण्यात आले. याप्रसंगी भगवान धन्वंतरी यांच्या मुर्तीभोवती राेग्य प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुगंधी वनस्पतींची आरास करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होतेे. दरम्यान, नाशिककरांनी सायंकाळी घरोघरी भगवान धन्वंतरीचे पूजन करून धने आणि गुळाचा नवैद्य दाखविण्यात आला. यावेळी नागरिकांनी सहकुटूंब फटाके फोडण्याचा आनंद लुटला.

हेही वाचा:

The post दीपोत्सव : धन्वंतरी पुजनाने धनत्रोयदशीचा आनंद द्विगुणित appeared first on पुढारी.