दीपोत्सव : मनेगावच्या विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ

मुरकुटे www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
फटाके आणि प्लास्टिक यापासून पर्यावरणाची हानी होत असल्याने मनेगावची फटाकेमुक्त दिवाळी आणि प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना तालुक्यातील प्रत्येक गावात राबवणार असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी केले.

मनेगाव येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी शाळेत वृक्षमित्र सुरेश कपिले यांच्या संकल्पनेतून फटाकेमुक्त दिवाळी आणि प्लास्टिकमुक्त गाव या उपक्रमाची सुरुवात जि. प. सेमी इंग्रजी शाळा आणि वृक्षमित्र परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांबरोबर उपस्थित मान्यवरांनीही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. उद्योजक रत्नाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कार्यक्रमास सरपंच संगीता शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, शालेेय समिती अध्यक्ष रवींद्र सोनवणे, किरण आंबेकर, योगेश शिंदे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधुकर घोडेकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन सोनवणे, शोभा भालेराव, सोसायटीचे चेअरमन हिरामण सोनवणे, खंडू करडग, रामदास सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, ग्रामसेवक. एम. बी. यादव आदी उपस्थित होते. वृक्षमित्र कपिले यांनी यांनी प्रास्ताविकात उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. राजाराम मुरकुटे यांनी उपक्रमाचे कौतुक करत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. अंकुश सहाणे यांनी सूत्रसंचालन केले. यश सोनवणे, अनुष्का गायकवाड, अंश जाधव, सिद्धी सोनवणे या विद्यार्थ्यांनी भाषणातून समाज प्रबोधन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ललित सोनवणे, वाल्मीक वाघ, मंजुषा ढोली, नवनाथ सांगळे, धनराज पाटील, अशोक पांगारकर, पौर्णिमा गाडे, पवित्रा गोसावी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post दीपोत्सव : मनेगावच्या विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ appeared first on पुढारी.