दुकानदाराने हप्ता न दिल्याने डोक्यात पेटली आग; भरदुपारच्या घटनेने परिसरात खळबळ

नाशिक रोड : देवळाली गाव परिसरातील मालधक्का रोड येथे ''मी या परिसरातील दादा असून मला गॅंग चालवावी लागते, त्यासाठी सर्वांना पैसे द्यावे लागतात. मला बाजूचे सर्व दुकानदार हप्ता देतात. परंतु, तुम्ही मला हप्ता का देत नाही?'' असे बोलून एकावर कोयत्याने हल्ला केल्याचा असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

अब्दुल गणी शेख यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रारीत म्हटले आहे की, माझे मालधक्का रोड परिसरात वजन नावाची बेकरी आहे. याठिकाणी चार नोकर कामावर आहे. मी बेकरीच्या बाजूला चहा पीत असतांना माझा नोकर जावेद असलम खान हा पळत आला. म्हणाला की, आपल्या बेकरीवर दोघा जणांनी हल्ला केलाय. गल्यातील पैसे लुटून नेले आहे. त्यामुळे धावत मी त्या ठिकाणी गेलो असता दोघे हल्लेखोर हातात कोयता व कुऱ्हाड घेऊन उभे होते. मी त्यांना विचारले असता, तुम्ही कोण आहे? असे म्हटल्यावर त्यातील एकजण म्हणाला की, मी तेजस गांगुर्डे मला ओळखत नाही का? या परिसरातील सर्व दुकानदार मला हप्ता देतात. तुमचा माणूस मला हप्ता देत नाही. माझी परिसरात मोठी गॅंग असून ती चालविण्यासाठी पैशाची गरज लागते. त्यामुळे याच्यापुढे मला हप्ता देत जा असे सांगून दोघेजण त्या ठिकाणाहून पसार झाले.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

त्यानंतर बेकरीत जाऊन बघितले असता आपला एक नोकर अरमान महमूद खान याच्यावर कोयत्याने हल्ला करून या दोघा हल्लेखोरांनी जखमी केले होते. त्यानंतर अरमान यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शेख यांच्या तक्रारनुसार पोलिसांनी तेजस गांगुर्डे व त्याच्या सहकार्य विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात