दुचाकीस्वारांना वाचवायला गेलेल्या ट्रकचालकाचे सुटले नियंत्रण; आणखी चार जणांचा जीव धोक्यात

सोग्रस (जि.नाशिक) : दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. आणि मग असा प्रकार घडला की आणखी चार जणांचा जीव धोक्यात आला. काय घडले नेमके वाचा...

काय घडले नेमके वाचा...
चांदवडहून नाशिककडे जाणारा मालवाहू ट्रक (आरजे १४, जीएल ३४ ८६)चे चालक व क्लीनर रात्री अकराच्या सुमारास चांदवडकडून नाशिककडे जाताना सोग्रसजवळ आले असता अचानक दोघे दुचाकीस्वार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मध्येच आले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने सरळ रस्त्यालगतच्या शिवाजी गांगुर्डे यांच्या साई मल्हार हॉटेलला धडक दिली.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात हॉटेलला धडक

या धडकेने हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर ट्रकचालक व वाहक गंभीर जखमी झाले. त्यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी अकराला पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोमवारी (ता. १४) रात्री अकराच्या सुमारास भरधाव ट्रकने दिल्याची घटना घडली.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ