दुर्देवी! डोळ्यादेखत पतीचा मृत्यू; पण अखेरचे अंत्यदर्शनही नाही पत्नीच्या नशिबी

नाशिक : डोळ्यादेखत पतीचा मृत्यू झाला असतानाही पत्नीला पतीच्या अंत्यदर्शनाला मुकावे लागल्याचा हृदयद्रावक प्रसंग नुकताच नाशिकमध्ये घडला. नेमके काय घडले?

डोळ्यादेखत पतीचा मृत्यू; पण अखेरचे अंत्यदर्शनही नाही पत्नीच्या नशिबी

एका खासगी रुग्णालयात (ता.२५) मार्चला रात्री आठच्या सुमारास भगवान अहिरे तसेच पत्नी उषा अहिरे ( वय ६८ ) या कोरोनाबाधित दाम्पत्याला दाखल करण्यात आले. दोघांना रक्तदाब, मधुमेह हे पूर्वीचे आजार होतेच. एकाच वार्डात उपचारा दरम्यान सुधारणा होत होती. त्यांना जयवंत नावाचा एकुलता एक मुलगा (वय ४२) व दोन विवाहित मुली आहेत. त्यांना पोटदुखीचा असह्य त्रास सुरू झाला.त्यांना ताबडतोब अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येऊन तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. पण अधिक गुंतागुंत वाढत जाऊन शेवटी शर्थीचे प्रयत्न करूनही डॉक्टरांना अहिरे यांना वाचविण्यात अपयश आले. डॉक्टर व कुटुंबियांना प्रश्न पडला की,पतीच्या निधनाची बातमी पत्नी उषाताई यांना कशी सांगावी ? त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल ? त्यांना हा धक्का पचवता येईल का ? यासंबंधी चर्चा होऊन सर्वानुमते अहिरे यांचा अंत्यविधी उरकून टाकण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

आईला वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी मनाई

उषाताईना अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून लवकरच ते बरे होतील असा आशावाद व्यक्त करून त्यांची समजूत काढली. मला त्यांना एकदा भेटू द्या अशी विनंती त्या करीत होत्या परंतु त्यांचा अंत्यविधी तर होऊन गेला त्यामुळे त्यांची समजूत कशी काढावी हा यक्ष प्रश्न सर्वांसमोर होता.शेवटी त्यांना सत्य सांगणे अटळ होते. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते.वडील तर गेले परंतु आता आई हातची जाऊ नये या एकमेव आशेने मुलाने आईला वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी मनाई करण्याचा निर्णय घेतला. शेवटी तीस मार्चला डिस्चार्ज देताना ही धक्कादायक बातमी आईला सांगण्यात आली. पतीच्या निधनाने उषाताईनी एकच टाहो फोडला. उपस्थित अत्यंत भावुक झाले.रुग्णालयात या हृदयद्रावक घटनेने शोककळा पसरली.  

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी