दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

नांदगाव (जि.नाशिक) : गुरुवारी सकाळी  जिभाऊ याचे वडील मधुकर गायकवाड सकाळी शेतावर चक्कर मारायला गेले आणि पण त्यावेळेस मधुकर यांनी जे काही पाहिले, त्यामुळे त्यांची व ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली. 
वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार

गुरुवारी(ता. २६) सकाळी मृत जिभाऊ याचे वडील मधुकर गायकवाड सकाळी शेतावर चक्कर मारायला गेले असता शेतातील कोपऱ्यातल्या खड्ड्यात जिभाऊचा मृतदेह आढळला. जिभाऊची हत्या करून मृतदेह त्यांच्या शेताजवळ टाकल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केल्याने धागेदोरे हाती लागण्याच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसराला पोलिसांनी पिंजून काढले. पोलिसांच्या तपासपथकाने घटनास्थळाजवळील मृतदेहाजवळची माती व रक्ताचे नमुने ताब्यात घेतले.  

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

घातपाताचा ग्रामस्थांचा संशय 

भौरी (ता. नांदगाव) येथे ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जिभाऊ गायकवाड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवार (ता. २५)पासून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा थेट गावाजवळील वडाळी रस्त्यालगतच्या एका खड्ड्यात मृतदेह मिळून आला.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ