दुर्दैवी! क्षणातच भंगले देशसेवेचे स्वप्न; पोलिस भरतीच्या सरावादरम्यान तरुणीचा मृत्यू

सातपूर (नाशिक) : घरात आई-वडिल आणि तीन अविवाहीत बहिणी यांची जबबाबदारी स्वत:च्या खाद्यांवर घेत, पोलिस सेवेत भरती होऊन देशसेवा  करण्याचं स्वप्न रोशनीने बाळगलं होतं.. पण रोशनीचं स्वप्न पुर्ण होण्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला...

महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्गात शिकणारी रोशनी घरातील थोरली मुलगी, तिला तीन लहान बहिणी आहेत. तिच्या वडिलांचे लॉकडाउननंतर कंपनीमधील काम गेले होते. त्यामुळे ते सध्या मोलमजुरी करत आहेत. घरातील आई-वडील व अविवाहित बहिणी अशी मोठी जबाबदारी रोशनीने आपल्या खांद्यावर घेतली होती.

कामगारनगर व सातपूर परिसरात हळहळ

पोलिसांत भरती होण्याचे स्वप्न असलेली रोशनी केदारनाथ जयस्वाल (२२, रा. कामगारनगर, पाइपलाइन रोड) ही तरुणी सकाळी पावणेसातच्या सुमारास मित्रांसोबत धावण्याचा सराव करीत होती. त्यादरम्यान ग्लेनमार्क कंपनीसमोरील रस्त्यावर धावत असताना नादुरुस्त घंटागाडी (एमएच १५, एन ५११६) ट्रॅक्टरला टोचन लावून जात होती. त्या वेळी रोशनी नादुरुस्त गाडीच्या (एमएच १८ एएन ३३७२) खाली अचानक सापडली व तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले. सरावावेळी तिच्यासोबतच पोलिस भरतीचा सराव करणारा मित्र उज्ज्वल डोंगरेही (२२, रा. संतकबीरनगर) जखमी झाला. पण दुर्दैवाने रोशनी यातून बचावली नाही तीचा दुर्दैवी अंत झाला. घंटागाडीच्या चालकासह दोन कर्मचारी विटकर व नेटावटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दुर्देेवी घटनेमुळे कामगारनगर व सातपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा