चांदवड पुढारी वृत्तसेवा – मामाच्या मुलाच्या वाढ दिवसासाठी आलेला चार वर्षीय मुलगा खेळता खेळता घराजवळच असलेल्या शेततळ्यात पडला. त्यास ताबडतोब उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे खडकओझर व वडाळीभोई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील खडकओझर येथील उमेश चिंधू पगार यांच्या मुलाच्या वाढ दिवसासाठी वडाळीभोई येथील चार वर्षीय भाचा रुद्र प्रमोद जाधव हा आपल्या आईसोबत मामाच्या घरी रविवार (दि.१७) रोजी आला होता. यावेळी सायंकाळच्या सुमारास रुद्र घराबाहेर खेळत होता. खेळता खेळता तो घरा जवळील शेततळ्याकडे गेला. यावेळी रुद्र शेततळ्यात पडला. रुद्र कुठे दिसत नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता तो शेततळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यास लगेचच शेत तळ्यातून बाहेर काढत उपचारासाठी वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. यावेळी डॉ. सुलोचना भोये यांनी रुद्रला तपासून मयत झाल्याचे सांगितले. यावेळी रुद्रच्या घरच्यांनी त्यांच्या नावाचा एकच हंबरडा फोडला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ब्राम्हणे करीत आहे.
हेही वाचा :
- अकोला : आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध आदेश जारी
- Kriti Kharbanda-Pulkit Samrat : लग्नानंतर क्रिती- पुलकितचा भन्नाट डान्स
The post दुर्दैवी घटना ! खेळताना शेततळ्यात पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.