दुर्दैवी! लग्नात नवदाम्पत्याला दिले शुभाशिर्वाद; पती-पत्नीच्या आयुष्यातील तोच शेवटचा लग्नसोहळा

नाशिक  : बुलडाणा येथील वराडे दाम्पत्य लग्नसमारंभासाठी भुसावळला आले होते. लग्नसमारंभात नवदाम्पत्यांना आशिर्वादही दिला. मात्र तोच लग्नसोहळा त्यांच्यासाठी शेवटचा ठरला...या घटनेने शोककळा पसरली आहे,

तोच लग्नसोहळा त्यांच्यासाठी शेवटचा ठरला.

बुलडाणा येथील चंद्रकांत जगन्नाथ वराडे (वय ६३) पत्नी संध्या वराडे (५६) यांच्यासह भुसावळच्या गडकरीनगरात नातेवाइकांकडील लग्नसमारंभासाठी आले होते. गुरुवारी (ता. ३) त्यांनी शहरातील देनानगरातील नातेवाइकांकडे मुक्काम केला. त्यानंतर दुचाकी (एमएच २८, एएल ६६७१)द्वारे खडका रोडने गडकरीनगराकडे येण्यासाठी निघाले होते. खडका चौफुलीवर भरधाव येणाऱ्या एका डंपरने कट मारल्याने दुचाकी घसरली व हे दांपत्य रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर दोघांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व सहकाऱ्यांनी घटनास्थही धाव घेतली. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

पती-पत्नी जागीच ठार

लग्नानिमित्त बुलडाणा येथून भुसावळ येथे दुचाकीवर आलेल्या दांपत्याला भरधाव येणाऱ्या डंपरने कट मारल्याने झालेल्या अपघातात बुलडाणा येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. शुक्रवारी (ता. ४) सकाळी सव्वाआठच्या सुमारास खडका चौफुलीवर हा अपघात झाला. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच