‘दुल्हन हम ले जाऐंगे‘ पण शेतकऱ्यांचा सन्मान राखूनचं..! नवऱ्याच्या कल्पनाशक्तीची पंचक्रोशीत चर्चा

खामखेडा (जि.नाशिक) : प्रत्येक विवाह सोहळ्यात काहीतरी वेगळे करण्याचा ट्रेंड वाढत आहे. कधी वरांची मिरवणूक, कधी व्यासपीठाची सजावट पाहण्यासारखी असते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर गाडीवर ‘दुल्हन हम ले जाऐंगे‘ असा फलक नेहमीच पाहण्यास मिळतो. पण खामखेडा येथील वराने नेलेली गाडी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. 

नवरदेवाची लक्षवेधक मिरवणूक
खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी संजय बच्छाव यांचे पुत्र कुशाल यांचे वरवंडी येथील रमेश आहेर यांची कन्या रूपालीसोबत विवाह झाला. हा विवाह देवळा येथे मुलीकडे असल्याने नवरदेव ज्या वाहनावर जाणार होता त्या वाहनाची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली. गाडीवर केलेली सजावट लक्षवेधक ठरली. संजय बच्छाव दर वर्षी दोन ते अडीच हजार क्विंटल उन्हाळी कांद्याचे उत्पादन काढतात. मुलाच्या विवाह सोहळ्यास मुलांच्या आग्रहाखातर त्यांनी सजावट केलेल्या गाडीवर ‘बागायतदार शेतकरी’ आणि वर छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटा पुतळा, लाकडी बैलगाडी ठेवल्याने सोशल मीडियातून कौतुक केले जात आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी... 
हल्लीच्या काळात हौस म्हणून नवरदेव लग्नासाठी चक्क हेलिकॉप्टरने जाऊन नवरी मुलीला आणतो. पण खामखेडा येथील कुशाल या तरुणाने नवरदेवाच्या गाडीवर ‘बागायतदार शेतकरी’ नाव लावत सजावट केली. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेव कुशाल बच्छावने हे नाव लिहिल्याचे ‘सकाळ’ला सांगितले. हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा