दुसरा विवाह करण्यासाठी पतीकडून छळ; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

नाशिक : दुसरा विवाह करण्यासाठी व फारकत द्यावी म्हणून पतीकडून छळ होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पतीने घरात घुसून पहिल्या पत्नीसह तिच्या माहेरच्या कुटुंबाला फायटर, कोयत्याने मारहाण करूनही किरकोळ गुन्हा दाखल करून पोलिस प्रकरण दडपत असल्याचा आरोप सामजिक कार्यकर्त्यांनी केला. 

दुसरा विवाह करण्यासाठी पतीकडून छळ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
रोहिदास आहेर ऊर्फ टिल्लू (रा. खरोली, ता. त्र्यंबकेश्‍वर) याने दुसरा विवाह केला असून, त्याला पहिल्या पत्नीपासून फारकत हवी आहे. फारकत मिळावी म्हणून त्याने दोन दिवसांपूर्वी पहिल्या पत्नीसह तिच्या माहेरच्यांना घरात घुसून मारहाण केली.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

शुक्रवारी (ता.१८) सामाजिक कार्यकर्त्यानी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन दिले. मुकुंद दीक्षित, वासंती दीक्षित, आपचे जितेंद्र भावे, रोहन देशपांडे, पद्मिनी वारे, कामिनी दोंदे, रामदास कानकाटे आदींनी निवेदन दिले. खरोली (ता. त्र्यंबकेश्वर ) येथील प्रकारात वाडीवऱ्हे पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.  

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा