दुसऱ्याच्या अंगणात बसून सुरु होती मनमानी; जरा टोकले तर थेट धक्कादायक कृत्य

नाशिक रोड : ऐन दिवाळीत घडला प्रकार...अंगणात दारु पिऊ नको म्हणताच राग झाला अनावर अन् नंतर थेट फोडली डोक्यात बिअर बाटली...घटनेने परिसरात खळबळ. वाचा काय घडले नेमके?

अशी आहे घटना

घरासमोरील अंगणात दारू पिण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या दोघा जणांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोजेस दयानंद पाटोळे (मालधक्का रोड) यांच्या घरासमोर किरण गांगुर्डे हा दारू पीत होता. त्यानंतर पाटोळे यांनी ''घरासमोर दारू पिऊ नको'', याचा किरण गांगुर्डे यांना राग आल्याने त्याचा मुलगा तेजस व त्याचा मित्र विनोद ऊर्फ विण्या या दोघांनी पाटोळे यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तर त्यांच्या भावाच्या डोक्यात वीट मारून जखमी केले.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

ऐन दिवाळीत घडलेल्या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेत दोघे जखमी झाले असून रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल