दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

नाशिक  : गेल्या वर्षाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने बालकांना कोरोना संसर्गाचा फारसा धोका नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेत म्हणजे फेब्रुवारी, मार्च महिन्यात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांमध्ये २० टक्के लहान मुले असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविले आहे. 

आजारी किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोरोनाची भीती अधिक असल्याचे सांगितले जात असले, तरी कोरोनाची काळजी न घेतल्याने तरुणांमध्ये कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण अधिक असल्याची बाब सप्टेंबर महिन्यातील एका अहवालातून स्पष्ट झाली होती. मे ते जून महिन्यात ६० पेक्षा अधिक वयोगटात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर मात्र तरुणांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक होते. एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मेपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर मात्र दर दिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने विक्रम मोडीत काढले. बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ५५.४७ टक्के, तर महिलांचे प्रमाण ४४.५३ टक्के आहे. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बचाव झाला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यातील कोरोना लाटेने लहान मुलांनाही घेरले आहे.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

दर दहा रुग्णांमागे दोन ते तीन मुले

२७ मार्च २०२१ ला शहरात सर्वाधिक दोन हजार १८१ नवे बाधित आढळून आले. महिनाभरात सुमारे ३० हजार रुग्ण नव्याने आढळले आहेत. कोरोना आजाराचा ट्रेंड तपासताना आरोग्य विभागाला लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. दर दहा रुग्णांमागे दोन ते तीन मुले कोरोना संसर्गित आढळून येत आहेत. लहान मुलांना होणाऱ्या कोरोना संसर्गात हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. 

हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...