देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर

भाग्यश्री पवार www.pudhari.news

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी दिली.

तत्कालीन देवळा ग्रामपालिकेचे सण २०१५ मध्ये देवळा नगरपंचायती मध्ये रूपांतर झाले असून, ह्या कार्यालयासाठी जागा कमी पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमार व त्यासाठी निधी मंजुरीसाठी जेष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, गटनेते संभाजी आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांनी गेल्या एक वर्षांपासून आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यासाठी शासनाने देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० लाख रुपये तसेच नगर पंचायत हद्दीतील मटण मार्केट बांधकामासाठी १ कोटी व सप्तशृंगी नगर ते स्वामी समर्थ नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याने नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उप नगराध्यक्ष मनोज आहेर आदींसह नगरसेवकांनी याकामी आभार मानले आहेत. या विकास कामांमुळे देवळा शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

हेही वाचा :

The post देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर appeared first on पुढारी.