देवळा येथे उन्हाळ कांदा बाजारात दाखल; ‘इतका’ मिळाला भाव

देवळा (जि. नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.१६) नवीन उन्हाळ कांद्याचे आगमन झाले. लाल कांद्यासोबत बाजार समित्यांना रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची प्रतीक्षा होती. ज्या शेतकऱ्यांचा लाल कांदा संपला. अशा काही शेतकऱ्यांनी रब्बीच्या उन्हाळ कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

या कांद्याला जास्तीत जास्त तीन हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या हंगामातील पहिलाच उन्हाळ कांदा बाजारात दाखल झाल्याने त्याचे स्वागत करण्यात आले. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सर्वच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उन्हाळ कांदा पिकवला. तो मंगळवारी देवळा बाजार समिती आवारात विक्रीसाठी आणला. या हंगामातील पहिल्यांदाच आलेल्या उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ७००, तर सरासरी तीन हजार ६०० रुपये व कमीत कमी तीन हजार ३०० रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची आवक कमी झाली. 

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश