देवळा शहराध्यक्षांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी! तालुक्याच्या राजकारणात पक्षाला धक्का

देवळा (नाशिक) : देवळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  जितेंद्र आहेर यांनी पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्याक्षांकडे देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.  तसेच इतरही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने स्थानिक व तालुक्याच्या राजकारणात पक्षाच्या दृष्टीने हा धक्का समजला जात आहे, तर आगामी महिन्यात होणाऱ्या देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. 

इतरही कार्यकर्ते यांते राजीनामे

जितेंद्र आहेर यांच्यासह पक्षाच्या महिला आघाडीच्या शहाराध्यक्षा सुलभा आहेर, नगरसेविका सिंधूबाई आहेर, बेबी नवरे, नगरसेवक तथा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस रघू नवरे व इतर कार्यकर्ते यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले.

Image may contain: 2 people, closeup

 

आहेर यांचे राष्ट्रवादीमध्ये योगदान

माजी सरपंच ते नगरपंचायतीचे विद्यमान गटनेते, देवळा तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे संचालक, देवळा बाजार समितीचे संचालक अशा अनेक पदांवर काम करत देवळा शहराच्या विकासात व जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे जितेंद्र आहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये योगदान दिले आहे. यांसह सुलभा आहेर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्याकडे पाठवला. पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडली असली तरी विकासाच्या दृष्टीने पक्षाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने आपण उद्विग्न झालो असल्याचे या वेळी पदाधिकऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

कार्यकर्यांच्या भूमिकेकडे लक्ष

येथील देवळा नगरपंचायतीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक आगामी महिन्यात होऊ घातली आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीत जितेंद्र आहेर व त्यांचे कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे व शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.   

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ