देव तेथेची जाणावा! कोरोनाकाळात जगण्याला पंख देणारा धन्वंतरी

चांदोरी (जि. नाशिक) : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ संत तुकोबारायांच्या ओवीतील देवाचे दर्शन सध्या रुग्णसेवा देणाऱ्या डॉ. प्रल्हाद डेर्ले यांच्या रूपाने चांदोरीसह गोदाकाठवासीयांना घडत आहे. 

रुग्णांच्या पंखात भरतात उमेदीचे बळ! 

कोरोना काळात खासगी हॉस्पिटलच्या बिलांच्या आकडेवारीने आणि बेडसाठी असलेल्या भल्यामोठ्या यादीने तर प्रियजनांना गमावल्यामुळे आलेल्या नैराश्यामुळे नागरिकांत सकारात्मकता निर्माण करणे एक आव्हान ठरत असताना रुग्णांवर उपचार करता करता त्यांच्या पंखात उमेदीचे बळ भरण्याचे काम डॉ. प्रल्हाद डेर्ले करीत आहेत. .

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

टेलिमेडिसीनच्या माध्यमातून करतात रुग्णांवर उपचार. 

३१ जानेवारी २००४ ला झालेल्या अपघातात त्यांचा पुनर्जन्म झाला. त्यामुळे ३१ जानेवारी २००५ पासून आजतागायत दर वर्षी ३१ जानेवारीला ते रक्तदान शिबिर घेतात. वर्षभरापासून कोरोनाच्या उद्रेकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, उत्पन्नाचे प्रमाण कुठे कमी झाले असताना वैद्यकीय खर्चात वाढ झाली. अशा काहीशा परिस्थितीत डॉ. प्रल्हाद डेर्ले दिवसभरात कित्येक कोविड रुग्णांची तपासणी करून उपचार करत आहे. ओपीडी लेव्हलला तपासणी करीत ९५ टक्के रुग्णांना घरीच उपचाराला प्राधान्य दिले जात आहे. रुग्णाला गरज असेल तरच नाशिक किंवा कोविड सेंटरला पाठवले जात आहे. गरजू व गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार केले जात आहेत. गोदाकाठचे अनेक रुग्ण गृहविलगीकरणात बरे झाले आहेत. स्वतः टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करताना कायम संपर्कात राहून आत्मविश्‍वास निर्माण करून देण्याचे काम डॉ. डेर्ले करीत आहे. 

शायराना अंदाजातून रुग्णांना ऊर्जा... 

कोरोना काळात रुग्ण व नातेवाइकांना अनेक बरे-वाईट अनुभव येत आहेत. अशा परिस्थितीत डॉ. डेर्ले शायराना अंदाजातून रुग्णांच्या मनात आत्मविश्‍वास जागवत आहे. ‘दोस्तो व्हायरस आते रहेंगे, जाते रहेंगे मगर, इन्सान के साथ साथ इन्सानियत भी जिंदा रहनी चाहिये...’ या शायरीतून रुग्ण सकारात्मक विचार करीत आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू