देशपातळीवर राज्यासारखीच महाविकास आघाडी उभी करा; पवारांना पालकमंत्री भुजबळांचे आवाहन 

पंचवटी (नाशिक) : फिनिक्स पक्षाला दुसरे नाव द्यायचे झाल्यास ते शरद पवार, असे द्यावे लागेल. देशपातळीवरील सर्वमान्य नेते ते असून, त्यांनी राज्यासारखीच देशपातळीवरही महाविकास आघाडी तयार करावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. १२) केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ८० व्या वाढदिवस शनिवारी व्हर्च्युअल पद्धतीने राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या मुख्य कार्यक्रमात केवळ दोनशे मान्यवरांना प्रवेश देण्यात आला होता. राज्यातील प्रमुख शहरांत हा कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने पार पडला. पंचवटीतील तपोवन परिसरातील जयशंकर फेस्टिव्हलच्या बँक्वेट हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

या वेळी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शेफाली भुजबळ, पंचवटी विभाग अध्यक्ष शंकर मोकळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी परिसराचे फुलांच्या माळा, रांगोळ्या काढून सुशोभीकरण करण्यात आले होते. या वेळी आयोजित रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमस्थळी पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला उजाळा देण्याऱ्या चित्रप्रदर्शनाचेही आयोजनही करण्यात आले होते. सर्वांत शेवटी  पवार यांनी राज्यभरातील पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला.

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण