धुळे, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील जनसामान्यांचा विचार करून वेगवेगळ्या योजना तयार केल्या. अनेक योजनांचा लाभ जनतेच्या बँकेच्या खात्यात जमा करून भ्रष्टाचार रोखण्याचे मोठे काम त्यांनी केल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो द्वारा धुळे येथील देवपूर बस स्थानक येथे आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळ महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, राज्य परिवहन महामंडळ धुळे आगाराचे अधीक्षक मनोज पवार, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख व सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आदी उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेला पंतप्रधान मोदी यांनी योजनेमध्ये सामावून घेतले. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीमच्या माध्यमातून केंद्राकडून येणारा पैसा लाभार्थीच्या खात्यात जमा केला. यावेळी त्यांनी भरड धान्याचे महत्व भामरे यांनी सांगितले.
महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी केंद्र शासनाचे 9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची व आंतरराष्ट्रीय भरडधान्य या विषयावर आयोजित चित्रप्रदर्शन पाहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
राकेश गाळणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे सहकारी प्रिती पवार, बापू पाटील, किरण कुमार यांनी विशेष परिश्रम घेतले.
हेही वाचा
- धुळे: पिंपळनेरमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद
- धुळे: मणिपूर घटनेच्या निषेधार्थ साक्री शहरात कडकडीत बंद
- धुळे: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा महापालिका आयुक्तांना घेराव
The post देशात भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी: खासदार डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.