देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

जळगाव www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे नाकाबंदी दरम्यान एकास देशी-विदेशी मद्याची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दारु जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 23 रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पो. नि संदीप पाटील, हवालदार योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार, पोकॉ.निलेश पाटील, कल्पेश पगारे, महेद्र सुर्यवंशी यांनी नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी केली. यावेळी चाळीसगाव कडून खडकी गावाकडे जाणाऱ्या मारुती व्हॅन क्रमाक (MH19DV1874) ला थांबवून तपासणी केली असता त्यात 18460 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या खोक्यात मिळून आल्या.

वाहन चालक प्रितम बाळकृष्ण देशमुख 26 रा. तळेगाव ता. चाळीसगाव यास वाहनासह ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

The post देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक appeared first on पुढारी.