दैव बलवत्तर म्हणून टळला अनर्थ! ओझरला सातवर्षीय चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न 

ओझर (जि. नाशिक) : येथील मिलिंदनगरमधील मजुरी करणाऱ्या महिलेच्या घरात घुसून बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटन समोर आली आहे,  चिमुरडीचे दैवच बलवत्तर होते म्हणून अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. 

नेमके काय घडले?

सातवर्षीय बालिकेचे गुरुवारी (ता.२५) रात्री दीडच्या सुमारास जवळच राहणाऱ्या तरुणाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. कविता जयवंत बच्छाव (वय २४, रा. राजवाडा, मिलिंदनगर, ओझर) यांची मुलगी रूचिका (वय ७), दोन मुले व पती घरात झोपलेले असताना घराचा दरवाजा अर्धवट उघडा असताना संशयित अनिल धर्मा सकट (२४, रा. राजवाडा, मिलिंदनगर, ओझर) याने घरात प्रवेश करून रूचिकाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

रुचिकाच्या ओरडण्याचा आवाज आल्याने आई कविता यांना जाग आल्याने त्यांनी घराबाहेर येऊन संशयिताच्या तावडीतून मुलीची सुटका केली. याप्रकरणी संशयिताविरोधात ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक अशोक राहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणपत जाधव, पोलिस उपनिरीक्षक ए. बी. तोडमल तपास करीत आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना