दै. ‘पुढारी’च्या ‘दीपस्तंभ’ला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

Deepastambh

नाशिक : येथील ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’ आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये दै. ‘पुढारी’ समूहाच्या सचिन परब संपादित ‘दीपस्तंभ’ या दिवाळी ● अंकाची २०२३चा ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे – अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (Deepastambh)

पुरस्कारात रोख २००० रुपये आणि सन्मानपत्र याचा समावेश असून, पुरस्कार वितरण समारंभ सोमवार, २५ डिसेंबर रोजी ओझर (नाशिक) येथे होणार आहे. इतर पुरस्कारांमध्ये उल्लेखनीय अंक म्हणून नगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी शाखेच्या ‘वारसा’ दिवाळी अंकाची निवड करण्यात आली आहे. इतर पुरस्कारप्राप्त दिवाळी अंक पुढीलप्रमाणे : ‘उत्कृष्ट विषय’ पुरस्कार ‘ऋतुचक्र’ (नाशिक), ‘उत्कृष्ट मांडणी’ पुरस्कार- ‘वाघूर’ (जळगाव), ‘उत्कृष्ट मुखपृष्ठ’ पुरस्कार-कादवा शिवार (दिंडोरी) आणि सृजनसंवाद (ठाणे)

हेही वाचा 

The post दै. 'पुढारी'च्या 'दीपस्तंभ'ला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार appeared first on पुढारी.