दोन बालिकेंच्या मृत्यूनंतर पिंपळगाव मोरला नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; पाहा VIDEO

खेडभैरव (जि.नाशिक) : पिंपळगाव मोर (ता. इगतपुरी) येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत होती. परिसरातील पिंपळगाव मोर व आधरवड येथील दोन बालिकेंचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत होती.

बिबट्याला जेरबंद करण्यात यश

पिंपळगाव मोर येथील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून चार पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावून वनविभागाचे अथक प्रयत्न सुरू होते मात्र मंगळवारी (ता.24) एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. परिसरात अजूनही बिबटे फिरत असल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात असून काही पिंजरे अजुन काही दिवस ठेवावेत अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली मेहनत

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल एकनाथ भले, वनरक्षक रेश्मा पाठक ,मालती पाडवी, फैजअली सय्यद,संतोष बोडके, बी.एस.खाडे, गोविंद बेंडकोळी, दशरथ निरगुडे,आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता