नाशिक : पुढारी ऑनलाइन
नाशिक महानगर पालिकेने कोट्यावधी रुपयांनी तोट्यात असणारी शहर बससेवा मोठा गाजावाजा करीत सुरू केली. मात्र सिटी लिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर चार – सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बससेवा बंद असल्याने नाशिककरांचे हाल झाले आहेत. दोन महिन्यांचे वेतन रखडल्याने वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
काल मंगळवारी (दि.१८) सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले मात्र अद्याप तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आजही हे आंदोलन सुरु ठेवल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. कालही प्रवाशांना दिवसभर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेली महापालिकेची बससेवा सुरू केली. मात्र थकित वेतनासाठी ठेकेदार मार्फत सुरू असलेली सिटीलिंक बस सेवा वर्षातुन अनेकदा ठप्प होते व दरवेळी प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे आपली राज्य परिवहन महामंडळाची सेवाच बरी होती. असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन दिले नसल्यामुळे पुन्हा एकदा काम बंध आंदोलन पुकारले आहे.
हेही वाचा :
- GDP : चालूवर्षी जीडीपी दर ६.४ टक्के राहण्याचा आशियाई विकास बॅंकेचा अंदाज
- Seema Haider : सीमा हैदरवर अटकेची टांगती तलवार, युपी ‘एटीएस’कडून चौकशी सुरु
- विजयकुमार देशमुखांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून भास्कर जाधवांचा युटर्न
The post दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प appeared first on पुढारी.