दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! ‘व्हॅलेंटाईन डे’पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

सटाणा (जि. नाशिक) : सध्या सगळीकडे प्रेमचा आठवडा साजरा होत आहे, त्यातच उद्या सर्वजण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत असतील. दरम्यान   शेवरे (ता. बागलाण) आदिवासी पश्चिम पट्ट्याच्या दुर्गम भागात गावालगतच्या  झोपडीत एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली, दरम्यान या घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. 

 झोपडीत आढळले मृतदेह

ज्ञानेश्वर पवार (वय २२, रा. भिलवाड, ता. बागलाण) व प्रमिला गवळी (१८, रा. शेवरे, ता. बागलाण) दोघेही ६ फेब्रुवारी २०१९ पासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्या दोघांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते न आढळल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी जायखेडा पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिलेली होती. जायखेडा पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असतानाच गुरुवारी (ता. ११) दुपारी बागलाण तालुक्यातील शेवरे शिवारात गडाच्या पायथ्याशी एका झोपडीत एका युवक व युवतीचा मृतदेह आढळल्याची माहिती भिलवाडचे पोलिसपाटील रवींद्र कुवर यांनी जायखेडा पोलिसांना दिली.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

शवविच्छेदनानंतर समजले कारण

जायखेड्याचे सहाय्यक उपनिरीक्षक कृष्णा पारधी व पोलिस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून दोघांचे मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असता विषारी औषध सेवन करून दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जायखेडा पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबांना घटनेची माहिती दिली. शवविच्छेदनानंतर सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी