द्राक्षपंढरीला थंडीने हुडहुडी!  द्राक्ष निर्यातदार शेतकरी हतबल

लासलगाव (जि.नाशिक) : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्षांना वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे हुडहुडी भरली आहे. कोरोना महामारीचा फटका वृत्तपत्र व्यवसायालाही बसल्याने त्याचा थेट परिणाम वृत्तपत्रांच्या रद्दीवर झाला आहे. वृत्तपत्र रद्दीच्या दरात तिपटीने वाढ होऊनही रद्दी उपलब्ध होत नसल्याने द्राक्ष निर्यातदार शेतकरी हतबल झाले आहेत. 

रद्दीच्या दरात मोठी वाढ; द्राक्ष उत्पादक हतबल
द्राक्षाचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वृत्तपत्र रद्दी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी द्राक्ष हंगामामध्ये १८० ते २०० रुपये प्रतिदहा किलो विक्री होणारी रद्दी ४५० ते ५०० रुपये प्रतिदहा किलोने विक्री होत आहे. रद्दीच्या भावात तिप्पट वाढ झाली असून, पैसे देऊनही रद्दी मिळत नसल्याने रद्दी देता का रद्दी, असे म्हणण्याची वेळ प्रथमच आली आहे. कोरोनामुळे अनेक दिवस वृत्तपत्र छपाई न झाल्याने त्याचा थेट परिणाम हद्दीवर झालेला आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका संभवतो, अशी अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवली होती. याचा एकूणच परिणाम वृत्तपत्र छपाई व खपावर झाला होता. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

द्राक्ष उत्पादकांचा खर्च
निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक व व्यापारी यांच्याकडून वृत्तपत्र रद्दीला मोठी मागणी आहे. निर्यातक्षम द्राक्ष घडाच्या उन्हापासून व धुळीपासून संरक्षणासाठी द्राक्ष उत्पादक द्राक्षघडाभोवती वृत्तपत्राचा कागद गुंडाळतात. घडांच्या संख्येनुसार द्राक्षबागेला एकरी चारशे ते पाचशे किलोग्रॅम रद्दीची गरज असते. रद्दीच्या भावात तिप्पट वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांचा खर्च वाढला आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

मागील चार दिवसांपासून द्राक्षबागांवर ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त फवारणीचे काम करावे लागत आहे, तर दुसरीकडे पेपर रद्दीचा भाव तिप्पट झाल्याने अतिरिक्त खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. -विकास रायते, द्राक्ष उत्पादक शेतकरी