द्राक्षबागेतील दृश्य पाहताच शेतकऱ्याला फुटला घाम; सात फुटी नागराज अवतरले!

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : द्राक्षबागेतील ते दृश्य पाहताच शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. अंतरवेली येथील चेतन बस्ते द्राक्षबागेत काम करताना भंबेरी उडाली आणि एकच गोंधळ उडाला...

द्राक्षबागेत दृश्य पाहताच शेतकऱ्याला फुटला घाम

द्राक्षबागेत विषारी नागाच्या वाढत्या वावरमुळे शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. अंतरवेली येथील चेतन बस्ते द्राक्षबागेत काम करताना सात फुटी नागराज अवतरले. उभारलेला फणा व फुत्काराने बस्ते यांची भंबेरी उडाली. सर्पमित्राला बोलावून नागराजाला जंगलात सोडून देण्यात आले. उष्णतेमुळे नाग, सर्प द्राक्षबागेत निवाऱ्यासाठी येत असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. द्राक्ष काढणीचा हंगाम वेगात सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठी धास्ती आहे.  

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

उन्हामुळे नागराज द्राक्षबागेत आश्रयाला 

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सर्वांच्या जिवाची काहिली होत आहे. प्राणी-पक्षीसुद्धा याला अपवाद नाहीत. नाग, सर्प यांनी उन्हाच्या तडाख्यातून बचावासाठी द्राक्षबागेच्या सावलीचा व गारव्याचा आधार घेतला आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा