द्राक्ष व्यापाऱ्याचा सव्वातीन लाखांना गंडा; परिसरात खळबळ  

कसबे सुकेणे (जि.नाशिक) : निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे व कसबे सुकेणे येथील तीन अल्पभूधारक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व्यापाऱ्याने सव्वातीन लाखांना गंडा घातला आहे. या व्यापाऱ्याने पैसे न देताच त्याने पोबारा केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

सव्वातीन लाखांना गंडा
मौजे सुकेणे येथील संदेश प्रकाश मोगल व कसबे सुकेणे येथील नंदू दशरथ भंडारे, राहुल कारभारी भंडारे या शेतकऱ्यांचा द्राक्षमाल आग्रा येथील द्राक्ष व्यापारी रवींद्र गोस्वामी याने घेतला होता. द्राक्षबाग सुरू केल्यानंतर दोन दिवसांत पैसे देतो, असे सांगून द्राक्षबाग अर्धवट सोडून पैसे न देता त्याने पोबारा केला आहे. त्यात अनुक्रमे संदेश मोगल (एक लाख ६० हजार ६५० रुपये), नंदू भंडारे (एक लाख ३५ हजार २००) व राहुल भंडारे (एक लाख १२ हजार ७०० रुपये) यांचे जवळपास सव्वातीन लाख रुपये व्यापाऱ्याने दिले नाहीत. संदेश मोगल यांना २० हजार रुपये दिले आहेत. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 
संशयित व्यापारी रवींद्र गोस्वामी हा दुचाकी (यूपी ८०, एफएम २१८६)ने येत होता. ओझर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक रहाटे तपास करीत आहेत.  

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना