धक्कादायक! ऑनलाईन फ्री फायर गेम खेळण्यासाठी निर्घूण हत्या; एकोणवीस वर्षीय तरुणाला अटक

नांदगाव : तालुक्यातील भौरी येथील खून प्रकरणाचा नांदगावच्या पोलिसांनी अट्ठेचाळीस तासात छडा लावला. मोबाईलमधील ऑनलाईन फ्री फायर गेम खेळण्याच्या व्यसनाधीन असलेल्या एकोणवीस वर्षीय तरुणाने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

घरातून बाहेर पडलेल्या जिभाऊ मधुकर गायकवाड (वय 38) या शेतकऱ्याचा चेहरा विद्रुप अवस्थेतील मृतदेह गावाजवळील वडाळी रस्त्यानजीक घरापासून शंभर मीटरच्या अंतरावरील एका खड्ड्यात आढळला. साध्या सरळ जिभाऊचा खून झाल्याच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होती. मृत जिभाऊचा मोबाईल मात्र गायब असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपासावर लक्ष केंद्रित केले होते. मयत जिभाऊच्या संपर्कातील गावातील तिघा - चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. सर्व प्रकारच्या शक्यता तपासून पाहता सुनील शिवाजी मोरे या एकोणवीस वर्षीय तरुणावर त्याच्याकडे मयताजवळील मोबाईल असल्याने पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. सुनीलला मोबाईलवर व लाईन फायरगेम खेळण्याचे व्यसन असल्याचे तपासात पोलिसांना जाणवले. त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने जिभाऊची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे कबुल केले.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनमाडचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक सिद्दार्थ आहिरे यांच्यामुळे अवघ्या अट्ठेचाळीस तासात प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार