धक्कादायक! कंपनीतील बदनामीला कंटाळून अधिकाऱ्याने संपविली जीवनयात्रा; वरिष्ठांकडून सतत मानसिक त्रास

सातपूर (नाशिक) : सतत कंपनीतून होणारा मानसिक त्रास आणि संगनमत करून सहकाऱ्यांच्या मदतीने वरिष्ठ करीत असलेल्या बदनामीला कंटाळून ४१ वर्षीय अधिकाऱ्याने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केली.

काय घडले नेमके?कंपनीतील बदनामीमुळे अधिकाऱ्याची आत्महत्या ​

नाशिक येथील इंदिरानगर परिसरात गुजरात येथील सानुश्री निधी लिमिटेड कंपनीची शाखा आहे. या शाखेत मिनेश चंद्रात्रे प्रमुख म्हणून काम पाहत होते. काम करत असताना कंपनीतील गौरव करकरे, जयेंद्र थोरात, गौरव वाणी यांनी एकत्र येत मिनेश यांच्या ताब्यातील कंपनीची महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतली. तसेच २० लाख रुपये घेतल्याचा आरोप करत त्यांची बदनामी केली. या त्रासाला कंटाळून मिनेश यांनी दिंडोरी येथील वन विभागाच्या शिवारात शनिवारी (ता. ९) विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

वणी पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक व कोठडी 

चंद्रात्रे यांच्या वडिलांनी तिन्ही संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वणी पोलिसांनी जयेंद्र, गौरव वाणी यांना ताब्यात घेतले. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.रविवारी (ता. १०) त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा