नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिस ठाण्यातच स्वतःच्या कॅबीनमध्ये मंगळवार (दि. २०) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय ४० ) यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारून जीवन संपवून टाकले आहे. असे करण्यामागील कारण अद्याप समजले नाही. नजन हे सकाळी घरून कार्यालयात आले होते. घटनास्थळी पोलिस अधिकारी यांनी धाव घेतली आहे.
The post धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले appeared first on पुढारी.