धक्कादायक प्रकार! बेड न मिळाल्याने रुग्णावर कारमध्ये उपचार; रुग्णांसह नातेवाईकही हतबल

नाशिक : पंचवटी विभागातील एका खासगी कोविड सेंटर सह शहरात अन्य कोठेच बेड न मिळाल्याने एका कोरोना रुग्णाला श्‍वसनाचा त्रास होवू लागल्याने अक्षरशः कारच्या मधल्या सीटसवर झोपवून सलाईन लावण्याची वेळ नातेवाईकांवर आली. मेट्रो शहराकडे वाटचालीचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिक शहरात वास्तव दर्शविणाऱ्या या धक्कादायक प्रकाराने आरोग्य व वैद्यकीय सेवेचे अक्षरश: धिंडवडे निघाले.

शहरातील परिस्थिती गंभीर

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट, तिप्पटीने वाढतं आहे. रुग्णालयांत रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याने बेड देखील शिल्लक राहीले नाही. महापालिकेच्या कोव्हिड सेंटर तर फुल्ल झालेच त्या शिवाय १४१ खासगी कोव्हीड सेंटर मधील बेड देखील फुल्ल झाले आहेत. सर्वसाधारण बेड तर सोडाच ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर बेड मिळाल्यास तो रुग्ण भाग्यवान अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. बेड अनुपलब्धतेचा प्रश्‍न कायम असतानाचं कोव्हीड रुग्णांसाठी आवशक्य असलेले रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्याने हताश नाशिककर रस्त्यावर उतरले आहेत. वैद्यकीय व आरोग्य सेवेची या दयनिय अवस्थेत रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु झाल्याचे प्रकार पंचवटी पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्हातून स्पष्ट झाला आहे. तर नाशिकरोड येथील एका रुग्णालयात मेडीकल बिलातून तब्बल वीस हजार रुपये अतिरिक्त काढण्याचा डाव सोशल मिडीयाच्या माध्यमातून हाणून पडला कोव्हिड काळात मानवतेला काळीमा फासणारे एक, एक प्रकार समोर येत आहे. रविवारी आणखी एका घृणास्पद प्रकाराची भर पडली. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

वैद्यकीय सेवेचा बोजवारा 

संबधित रुग्णाला श्‍वसनाचा त्रास होवू लागल्याने महापालिकेसह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये प्रयत्न केले परंतू तेथे बेड उपलब्ध झाला नाही. अस्वस्थता अधिक वाढल्याने पंचवटी विभागातील एका खासगी रुग्णालयात धाव घेतली तेथेही बेड नसल्याने रुग्णाला कार मधील मधल्या सीटवर झोपवून सलाईन देण्याची वेळ आल्याने शहरातील वैद्यकीय व आरोग्य सेवेची बिघडलेली परिस्थिती या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ