धक्कादायक! बेशुध्द पडलेल्या मित्राच्याच डोक्यात घातला दगड; तपासात झाला खुलासा

नाशिक : दारु पिल्यानंतर मानसाचे रुपांतर राक्षसामध्ये  होण्यास फारसा वेळ लागत नाही. नशेत एखादा कुठल्या थराला जाईल हे सांगता येणे कठीण आहे, अशाच एका घटनेत हाणामारीत बेशुध्द पडलेल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. 

मंगळवारी (ता.५) रात्री आनंदवली परिरात वापरात नसलेल्या महापालिकेच्या एका निर्जन इमारतीत युवकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. खूनी पोलिसांना जागेवरच सापडला. परंतू, ज्याचा खुन झाला त्याचा शोध रात्री उशिरपर्यंत सुरू होता. अखेर त्याचीही ओळख पटली असून, खून झालेला युवक व संशयित दोघेही मित्र असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

..म्हणून घातला डोक्यात दगड

मद्य सेवनानंतर हाणमारी होऊन मित्र बेशुद्ध पडला. बेशुध्द मित्र उठल्यावर आपल्याला संपवेल या भितीतून दुसऱ्याने बेशद्ध अवस्थेतील मित्राच्या डोक्यात मोठा दगड घालूनत्याला संपवल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. दरम्यान, महेश विष्णू लायरे (29,रा. दत्तनगर, चुंचाळे), असे मृत युवकाचे नाव आहे. तर, रुपेश छोटुलाल यादव (३६, रा.शिवशक्ती चौक, सिडको )असे या संशयिताचे नाव आहे. संशयितास १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

रात्री उशिरापर्यंत मयताच्या नातेवाईकांची शोधाशोध

माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित नशेत बडबडणाऱ्या संशयित रुपेश यास अटक केली. तसेच, इमारतीत अंधारात पडलेला मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. संशयित यादम खूप मद्य पिला असल्याने खून झालेल्या मित्राचे नाव तो पोलीसांना सांगत नव्हता यामुळे रात्री उशिरापर्यंत मयताच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू होती. अखेरीस त्याचेही नाव निष्पन्न झाले. याप्रकरणी संशयिताविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.  

हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड