धक्कादायक! भर मध्यवस्तीतील अपार्टमेंटमध्ये देहव्यापाराचा अड्डा; डांबून ठेवलेल्या १३ पीडित तरुणांची सुटका 

नाशिक : प्रभुदेवा अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या अनैतिक देहव्यापाराबद्दल पोलीसांना माहिती मिळाली. देहव्यापारासाठी जवळपास १३ जणींना डांबून ठेवण्यात आले होते. पुढे....

चक्क अपार्टमेंटमध्ये देहव्यापाराचा अड्डा;
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (ता. २७) या अड्ड्याची माहिती घेत, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई नियोजन करीत, त्यानुसार रविवारी कारवाई करण्यात आली.

प. बंगाल, बिहारमधील देहव्यापारातील १३ पीडित तरुणांची सुटका 

विनयनगर येथील प्रभुदेवा अपार्टमेंटमध्ये चालणारा संशयित फिलोमिना शर्मा व अर्जुनसिंह चौहान यांच्या अनैतिक देहव्यापाराच्या अड्ड्यावर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध शाखेने छापा टाकत, देहव्यापारासाठी डांबून ठेवलेल्या परराज्यातील १३ तरुणींची सुटका केली. भर मध्यवस्तीतील या अड्ड्यावरील छाप्यातील संशयित महिलेसह दोघांना ३ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली. प्रभुदेवा अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या या अड्ड्यावर यापूर्वी दोनदा कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या व्यवसायात अडकलेल्या सर्व १३ पीडित तरुणींची महिला वात्सल्यगृहात रवानगी केली.

संशयितांना पोलिस कोठडी
पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने बोगस ग्राहक पाठवून प्रभुदेवा अपार्टमेंटमध्ये कारवाई करीत, संशयित फिलोमिना शर्मा आणि अर्जुनसिंह चौहान यांच्या मुसक्या आवळल्या. विनयनगरच्या अड्ड्यावरील पश्चिम बंगाल व बिहारमधील १३ युवतींची सुटका करण्यात आली. संबंधित या वेळी आलेल्या सहा ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई नाका पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून, दोघा संशयितांना येत्या ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.